डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्य सरकारकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं या भाषेचा शिक्षणाच्या वापराचं प्रमाण वाढेल. जगभरात मोठ्या प्रमाणात मराठी भाषा पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीनं अभिजात मराठी सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. काही दशकांपूर्वी २-३ पुस्तक मराठीतून गुजरातीमध्ये भाषांतरीत केल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. अमदाबादमध्ये राहणाऱ्या भिडे कुटुंबियांनी मराठी शिकवल्याचं ते म्हणाले. 

 

मराठीला प्राधिकृत भाषेचा दर्जा द्यावा. यामुळं उच्च न्यायालयात मराठीत कामकाज होईल असं मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले. आता या भाषेचा सन्मान राखत ती आणखी समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, अशी भावना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केली. मराठी भाषेला इतका मोठा दर्जा मिळणे म्हणजे माझ्या आईचा सन्मान केल्याची भावना आहे, असं  अभिनेते सचिन पिळगावकर यावेळी म्हणाले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ३ ऑक्टोबर २०२४ हा महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असल्याचं संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे म्हणाले. पद्मश्री नामदेव कांबळे, कवी मधु मंगेश कर्णिक यांच्यासह अनेक साहित्यिक, कवी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा