मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात आज पुकारलेल्या जालना जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मागण्यांचं निवेदन पोलीस प्रशासनाला सादर केले.
Site Admin | September 22, 2024 7:17 PM | Jalna
जालना जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद
