डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मराठा समाजातल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ४२ पुरावे देता येणार

मराठा समाजातल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता ४२ पुरावे देता येणार आहे. मराठा समाजातील नागरिकांना यापैकी कुठल्याही एका पुराव्यांच्या आधारे मराठा कुणबी नोंदींची पडताळणी करणं शक्य असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर काल ते बोलत होते. 

 

SEBC अर्थात सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाऐवजी EWS अर्थात आर्थिक दृष्टया मागास प्रवर्गातल्या आरक्षणाची मागणी मराठा समाजाच्या विविध संघटनांनी केली आहे. पण आता तो पर्याय उपलब्ध नाही. ईडब्लूएस प्रवर्गात जाती आधारित आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाला गेल्या तीन वर्षात हे आरक्षण केवळ साडे आठ ते नऊ टक्के मिळालं आहे. SEBC असताना आर्थिक दृष्या मागासचं आरक्षण देता येत नाही, जातीचं आरक्षण मिळणाऱ्यांना ते आरक्षण मिळणार नाही. आता हा नवीन विषय समोर आला असंही त्यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा