मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण काल मागे घेतलं. सरकारी शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा समावेश होता. मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरेसंदर्भातली अंमलबजावणी करण्याची जरांगे यांची मागणी असून, सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा, या काळात मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन या शिष्टमंडळानं दिलं. यावर सहमती दर्शवत जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं.