पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. मनु भाकरने पात्रता फेरीत ५८० गुण मिळवत तिसरं स्थान पटकावलं. तर रिदम सांगवानला १५ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात भारताचं आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात आलं आहे. आज झालेल्या पात्रता फेरीच्या स्पर्धेत भारताचे संदीप सिंग आणि एलविन वलारिवान या जोडीला पात्रता फेरीत १२ व्या स्थानावर तर अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल या जोडीला ६ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सरबज्योत सिंग नवव्या तर अर्जुनसिंग चीमा २२ व्या क्रमांकापर्यंत पोहचू शकले. पुरुषांच्या एकल नौकानयन स्पर्धेत, बलराज पन्वारने चौथ्या स्थानावर आपली शर्यत पूर्ण केली.
पुरुषांच्या एकल नौकानयन स्पर्धेत, बलराज पन्वारने चौथ्या स्थानावर आपली शर्यत पूर्ण केली. उद्या त्याला उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळेल.
हॉकीमध्ये ब गटात भारतीय पुरुष संघाचा सामना आज न्यूझीलंडशी होणार आहे.
टेनिसमध्ये, रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजी या भारतीय जोडीची पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीसाठी लढत खराब हवामानामुळे वेळेत सुरू झाली नाही. तर बॅडमिंटनमध्ये, लक्ष्य सेनची पुरुष एकेरीच्या गटात, तर पुरुष दुहेरी गटात, भारताची अव्वल जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची यांच्या लढती रात्री होणार आहेत. महिला दुहेरी गटात, अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो या जोडीचाही सामना आज होणार आहे.