केंद्र सरकारच्या कीर्ती अर्थात खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं होणार आहे.
तळागाळातल्या प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कीर्ती हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. उपक्रमाचा पहिला टप्पा चंदिगड इथं सुरू झाला. या टप्प्यात ३ लाख ६२ हजार ६८३ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यात तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती अशा ११ खेळांचा समावेश आहे.