देशातल्या युवकांनी राष्ट्र प्रथम या भावनेनं काम करावं असं आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित विकसित भारत युवा संसदेत बोलत होते.
भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात युवकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. विकसित भारत या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय युवा संसदेत देशभरातल्या ३०० जिल्ह्यातले युवक सहभागी झाले आहेत. युवा संसदेतून युवकांना देशाच्या लोकशाहीचं स्वरूप समजून घेता येईल, असं मांडवीय यांनी सांगितलं.