मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यासह ९ जणांना जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. वाळू माफिया आणि इतर गुन्हेगारीविरोधातल्या कारवाईचा भाग म्हणून ही कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या आठ जणांविरोधात २०१९ मधे वाळू चोरी, आंतरवली सराटी इथल्या आंंदोलनात जाळपोळ करणं आणि शासकीय कामकाजात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. यातले सहा जण मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होते.
Site Admin | February 9, 2025 8:02 PM
मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह ९ जण तडीपार, वाळू माफियांविरोधात प्रशासनाची कारवाई
