आचारसंहिता लागायच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा होती, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आरक्षण मिळू दिलं नाही, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी संवाद साधला. आता विधानसभा निवडणुकीत कुणाच्या जागा वाढवायच्या आणि कुणाच्या कमी करायच्या हे आम्ही ठरवू, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.
आमची निवडणुकीसाठीही संपूर्ण तयारी आहे. याबाबत लवकरच समाजाची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अस त्यांनी सांगितलं. लोकसभेपेक्षा जास्त ताकद दाखवा, असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं.