मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी या गावात पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगेसोयरेंची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, तसंच तीनही गॅझेट लागू करावे या मागणीचा त्यांनी पुनरुउच्चार केला. सरकारनं आपल्या मागण्या मान्य न केल्यानं पुन्हा उपोषण करण्याची वेळ आल्याचं जरांगे पाटील म्हणाले. सरकारच्या लाडका भाऊ, लाडकी बहीण या योजनांवरही जरांगे यांनी टीका केली. सध्या शेत कामांचे दिवस असल्यानं कुणीही आंतरवालीकडे येऊ नये, असं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे. दरम्यान, सरकारनं परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क माफ करत मुलींना मोफत शिक्षण दिल्याच्या निर्णयाचे जरांगे यांनी स्वागत केलं आहे.
Site Admin | July 20, 2024 7:34 PM | Manoj Jarange Patil | Maratha reservation