डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 30, 2025 7:04 PM | Manoj Jarange Patil

printer

मनोज जरांगे यांचं सहाव्या दिवशी उपोषण स्थगित

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण स्थगित केलं. शिंदे समितीचं काम पुन्हा सुरू करण्यात  येईल, मराठा  आरक्षण आंदोलकांवर दाखल गुन्ह्यांची तपासणी करून गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली जाईल, कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी स्थापन केलेले कक्ष पुन्हा सुरू केला जातील, असं लेखी  आश्वासन जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण स्थगित करायचा निर्णय घेतला. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्याआधी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश  धस, प्रकाश सोळंके यांनी जरांगे यांची भेट घेत चर्चा केली. दरम्यान, जरांगे यांना छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा