गेल्या दीड वर्षात मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राज्यातल्या जनतेची माफी मागितली आहे. यंदाचं संपूर्ण वर्षही राज्याला खूप वाईट गेलं. अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, अनेकांनी घरे सोडली, यासाठी आपल्याला दु:ख आणि पश्चात्ताप होत आहे. मणिपूर राज्यात 3 मे 2023 पासून आजपर्यंत जे काही घडले त्याबद्दल आपण राज्यातल्या जनतेची माफी मागतो, असं ते म्हणाले. गेल्या तीन-चार महिन्यांतली शांततापूर्ण परिस्थिती पाहता, 2025 मध्ये राज्यातली स्थिती पूर्ववत होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या हिंसाचारात आतापर्यंत सुमारे २०० जणांचा मृत्यू झाला असून ६२५ संशयितांना अटक झाली आहे. तसंच राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून सुमारे ५ हजार सहाशे शस्त्र आणि ३५ हजार दारूगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
Site Admin | December 31, 2024 8:18 PM | Manipur Violence
गेल्या दीड वर्षात झालेल्या हिंसाचाराबाबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मागितली माफी
