मणिपूरमधील राजकीय अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना सुपूर्द केला. 2017 मध्ये मणिपूरमध्ये भाजप सत्तेत आल्यापासून ते भाजप सरकारचे नेतृत्व करत आहेत. एन. बिरेन सिंह भाजप ईशान्य प्रभारी संबित पात्रा यांच्यासह काल दुपारी इम्फाळला पोहोचले, तिथे त्यांनी पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली.
त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी राज्यपालांना आपला राजीनामा सादर केला. दरम्यान, मणिपूर विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. एन. बिरेन सिंह काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.