मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव राज्यसभेत आज पहाटे मंजूर करण्यात आला. लोकसभेत हा ठराव या आधीच मंजूर झाला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून मणिपूरमध्ये कोणताही हिंसाचार झाला नाही, असं या ठरावावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. मणीपुर मधील परिस्थिति हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असल्याचा विरोधकांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.