कांद्यासंदर्भात निश्चीत धोरण ठरवण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच नाशिकला आले. त्यावेळी ते बातमीदारांशा बोलत होते. वारंवार वातावरणात होणारे बदल तसंच शेतीमालाच्या भावावर होणारा परीणाम आणि वीजेसह अन्य समस्यांबाबत काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, नाशिकमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्री मंडळात स्थान मिळालं नसल्यानं ते नाराज आहेत. मात्र, ते मंत्री असताना आम्ही कधी नाराज झालो नाही, मग आता आम्हाला मंत्रीपद मिळाल्यान ते नाराज का, असा प्रश्न कोकाटे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी त्यांनी काही टीका केली तर खपवून घेतली जाणार नाही असेही ते म्हणाले.