राज्य शासनामार्फत नवीन कृषी धोरण आखणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि अन्न धान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वंयपूर्ण व्हावा, या उद्देश्यानं हे धोरण आखणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं.
\काल कोल्हापूर इथं झालेल्या प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी उपस्थित होते.