शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं सोपं व्हावं यासाठी विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. नागपूर इथं प्रगतीशील शेतकऱ्यांच्या परिसंवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना, उपक्रम राबवले जात आहेत, शासन शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे, असं कोकाटे म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.