भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यांच्या आज जळगाव, बुलडाणा आणि अमरावती याठिकाणी प्रचारसभा देखील होणार आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील आज मुंबईत महाविकास आघाडीचं घोषणापत्र जारी करणार आहेत. काँग्रेसचे सचिव के सी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यावेळी उपस्थित असतील.
Site Admin | November 10, 2024 8:42 AM | जाहीरनामा | भाजप | महाविकास आघाडी