येत्या २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताने तयारीला सुरुवात केली असून खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी त्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातील, असं केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या १५२व्या मिशन ऑलिम्पिक सेल बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ताज्या दमाच्या होतकरू खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय आणि पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले.
Site Admin | January 7, 2025 8:13 PM | Dr. Mansukh Mandaviya
येत्या २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताची तयारी सुरु
