इलेक्ट्रानिक उपकरणांवर होणारा खर्च आणि त्यांच्या वापरातून निर्माण होणारा कचरा कमी करण्यासाठी युरोपियन महासंघाने सर्व नवीन उपकरणांना समान चार्जर वापरण्याची सक्ती करणारा नियम कालपासून लागू केला. त्यामुळे नवीन स्मार्टफोन, टॅबलेट आणि कॅमेऱ्यांना सी प्रकारचा चार्जर देणं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. या नियमाबाबतची माहिती महासंघाने आपल्या समाज माध्यमावर दिली आहे. त्यामुळे प्रत्येक उपकरणाला नवीन चार्जर घेण्याची गरज पडणार नसून त्याचा खर्च आणि होणारा कचरा कमी व्हायला मदत होईल, असं महासंघाने म्हटलं आहे.