येत्या काळात भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं आखाती तसंच भूमध्य प्रदेशाची भूमिका महत्वाची असणार आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते बहरीन इथं झालेल्या मनामा डायलॉगला संबोधित करत होते. हरीत हायड्रोजन आणि हरीत अमोनिया सारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये आखाती तसंच भूमध्य प्रदेशांची भूमिका महत्वाची असेल असं ते म्हणाले. यावेळी जयशंकर यांनी पश्चिम आशियायी प्रदेशाबाबतच्या भारताच्या सर्वसमावेशक धोरणाबाबत आपल्या संबोधतानून सांगितलं, तसंच भारताच्या आर्थिक आणि सामरिक हितसंबंधांसाठी या क्षेत्राचं महत्त्वही अधोरेखित केलं.
आखाती आणि भमध्य प्रदेशात स्थायिक झालेले भारतीय नागरिक भारत आणि पश्चिम आशियायी देशांना जोडणारा दुवा आहेत. ते द्विपक्षीय संबंध आणि आर्थिक विकासात महत्त्वाचं योगदान देत आले आहेत, असं जयशंकर यांनी यावेळी नमूद केलं.