काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्राच्या लोकांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला. इगतपुरी इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करणं, २ कोटी रोजगार निर्माण करणं इत्यादी आश्वासनं प्रधानमंत्र्यांनी दिली, पण ती पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी केली. देशातली सर्व विकासकामं आपल्याच कार्यकाळात झाल्याचा दावा प्रधानमंत्री करतात, पण देशाच्या विकासाचा पाया माजी प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रचला, असं ते म्हणाले. दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं, मात्र मोदी यांनी त्यांचा अपमान केला, असंही ते म्हणाले.
Site Admin | November 14, 2024 6:58 PM | Congress | mallikarjun kharge
प्रधानमंत्री मोदी आणि भाजपने महाराष्ट्राच्या जनतेला खोटी आश्वासनं दिली – मल्लिकार्जुन खर्गे
