राज्यातलं महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज लातूर इथल्या प्रचारसभेत केली. केंद्रातलं भाजपा सरकार शेतमालावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट करत आहे, सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात वाढ केली जात नाही अशी टीका खर्गे यांनी केली. सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं होतं. मात्र ते पाळलं नाही, असा आरोप करत महायुतीचं फसवं सरकार उलथून टाकून महाविकास आघाडीला विजयी करा, असं आवाहन मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं.
Site Admin | November 13, 2024 8:29 PM | Congress | mallikarjun kharge
महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची खर्गे यांची टीका
