मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा एच. एस. प्रणॉय आणि मालविका बनसोड या दोघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ली शिफेंग यानं प्रणॉयवर ८-२१, २१-१५, २१-२३ असा विजय मिळवला, तर महिला एकेरीच्या प्राथमिक फेरीत चीनच्याच हान युए हिनं मालविकावर २१-१८, २१-११ अशी मात केली. महिला दुहेरीतही त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला प्राथमिक फेरीतच चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
Site Admin | January 9, 2025 8:26 PM | Malaysia open 2025