प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचे उद्घाटन होणार आहेत. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे. ओडिशाला पुर्वोदय दृष्टीकोनाचे केंद्र तसेच भारताचे आघाडीचे गुंतवणूक स्थळ आणि औद्योगिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने ओडिशा सरकारने या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेतून राज्याला पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याची आशा आहे. तसंच रोजगार निर्मितीत साडेतीन लाख वाढ रुपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे.
Site Admin | January 28, 2025 9:42 AM | Make in Odisha
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘मेक इन ओडिशा’ परिषदेचं उद्घाटन होणार
