भारतीय अर्थव्यवस्था, मेक इन इंडिया योजनेमुळे जागतिक स्तरावर कशी उंचावत आहे याची एक झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. यामध्ये, भारतीय बनावटीच्या विविध उत्पादनांच्या निर्यातीच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढता प्रभाव, सहभाग, उपस्थितीविषयी त्यांनी भाष्य केलं आहे.
भारतीय बनावटीच्या सायकलची निर्यात इंग्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांमध्ये वाढल्यानं जागतिक स्तरावर तिचा बोलबाला झाला आहे. बिहारमध्ये तयार होणारे बूट रशियन सैन्याद्वारे वापरले जातात. हा टप्पा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या उच्च उत्पादन क्षमता, गुणवत्ता यावर शिक्कामोर्तब करणारा आहे. तर आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी, जागतिक पसंती मिळालेल्या काश्मिरच्या विलो बॅटला मोठी मागणी आहे. भारताच्या उत्कृष्ट कारागिरीचे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरच्या भारताच्या प्रभावाचे हे उदाहरण आहे. देशातला अग्रणी दुग्धोत्पादन व्यवसाय असलेल्या अमूलने नुकतीच अमेरिकेत त्यांची उत्पादने सादर केली आणि जगाच्या बाजारात भारतीय दुग्धोत्पादनांची चव पोचवण्याच्या प्रयत्नांप्रती वचनबद्धता राखली आहे.
भारताची डिजीटल देयक व्यवस्था युपीआय ला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्यानं अनेक देशांमध्ये डिजीटल पेमेंटचा मार्ग खुला झाला आहे. ही तांत्रिक प्रगती भारताच्या अर्थतांत्रिक संशोधानातल्या नेतृत्व आणि जगभरात डिजीटल व्यवहारात क्रांती घडवण्याप्रती असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम असलेली ब्राह्मोस क्षेपणा्स्त्र सध्या दक्षिण चीन समुद्रात कार्यरत आहेत. हा विकास भारताच्या धोरणात्मक संरक्षण क्षमतेवर तसेच जागतिक सुरक्षा वाढीसंदर्भात भारताच्या भूमिकेवर भर देतो. डिजीटल विपणन मंचांवर भारतीय उत्पादनांनी अॅमेझॉनच्या वैविध्यपूर्ण योजनांमध्ये वर्चस्व राखल्याने ती जागतिक पटलावर लक्षवेधक ठरली यामुळे भारतीय बनावटीच्या वस्तूंची आंतरराष्ट्रीय मागणी वाढते आहे.