डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लंडनमध्ये भीषण आग, हीथ्रो विमानतळ बंद

लंडनमध्ये एका विद्युत उपकेंद्राला आग लागली असून त्यातून दीडशे जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पश्चिम लंडन भागातल्या या उपकेंद्राला काल रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि ७० कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग लागण्याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, त्यामुळे लंडनच्या पश्चिम भागातल्या सुमारे १६ हजार ३०० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. लंडनच्या हीथ्रो विमानतळाचा वीजपुरवठाही खंडित झाला असून आज दिवसभरात विमानतळ बंद राहील अशी माहिती विमानतळाने अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. 

 

या आगीमुळे हीथ्रोकडे येणाऱ्या आणि येणाऱ्या किमान १ हजार ३५१ विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळाहून हीथ्रोला जाणारं एक विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आलं असून दिल्ली विमानतळाहून निघालेलं विमान फ्रँकफर्टच्या दिशेने वळवण्यात आलं असल्याची माहिती, एअर इंडिया या विमान कंपनीने दिली आहे. मात्र, उर्वरित सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली असून प्रवाशांनी अधिक माहितीसाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन विमानतळ प्राधिकरणाने केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा