सोलापूर महापालिकेचे माजी महापाैर महेश विष्णूपंत काेठे यांचं आज सकाळी उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते साठ वर्षांचे होते. कोठे प्रयागराज इथं कुंभमेळ्याला गेले होते. आज सकाळी स्नान करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. साेलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी महेश काेठे यांची ओळख हाेती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असणाऱ्या महेश कोठे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली हाेती.
Site Admin | January 14, 2025 3:21 PM | Mahesh Kothe | Prayagraj | Solapur