महावितरण अभय योजनेला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळं वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केलं. यापूर्वी योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती.
Site Admin | January 3, 2025 7:40 PM | Mahavitran
महावितरण अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
