सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज कंपनी म्हणून केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळानं महावितरणचा गौरव केला आहे. शुक्रवारी नवी दिल्ली इथं झालेल्या समारंभात महावितरणच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महावितरण मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करते. कंपनीचे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी असे 3 कोटी 11 लाख ग्राहक असून, ती देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे.
ग्राहक सेवेसाठी आणि वीज वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर, ऊर्जा परिवर्तन आराखडा राबवून नवीकरणीय ऊर्जेच्या वापरावर दिलेला भर, वीज खरेदी खर्चात कपात करून ग्राहकांसाठीचा वीजदर कमी करण्यासाठी आयोगासमोर मांडलेला प्रस्ताव, शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध