महाविकास आघाडीच्यावतीनं सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ७० टक्क्यांहून अधिक पदं रिक्त असून नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. याबाबत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तसंच अधिष्ठाता यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
Site Admin | October 14, 2024 7:06 PM | Sindhudurga
मविआचं सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन
