आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या गैरप्रकारांची दखल निवडणूक आयोगानं घ्यावी आणि मतदार याद्यांमधल्या अनियमिततेबद्दल श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली आणि त्यांना यासंदर्भात निवेदन दिलं. तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगालाही या संदर्भात पत्र लिहिलं आहे. पराभवाची भीती वाटत असल्यानं महाविकास आघाडीच्या समर्थकांची नावं मतदार याद्यांमधून वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७ आणि ८ मध्ये फेरफार केल्याचा आरोपही महाविकास आघाडीनं भाजपावर केला आहे.
Site Admin | October 18, 2024 9:04 PM | Assembly Election | BJP | Mahavikas Aghadi