भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचा अर्थात फिक्कीचा या वर्षाचा सर्वोकृष्ट विद्यापीठ हा पुरस्कार राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाला मिळाला आहे. केंद्र सरकारच्या ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचं कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात विस्तारलेलं आहे. कृषि विद्यापीठानं आत्तापर्यंत अन्नधान्य, फळं, फुलं, चारा, पिकं याची 306 हुन अधिक वाण विकसीत केली असून मृदा आणि जलसंधारण, पीक लागवड पध्दती, खते आणि पाणी व्यवस्थापन, हरितगृहातील शेती, प्रक्रीया, दुग्धशास्त्र या विषयी सखोल संशोधन केलं आहे. हा पुरस्कार मिळवणारं महाराष्ट्रातील हे एकमेव विद्यापीठ आहे.