डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाचा बहिष्कार

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला आहे. 

 

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आज नागपुरात बैठक झाली, त्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षांनी वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते वेळी उपस्थित होते. 

 

परभणीमध्ये एका दलित कार्यकर्त्याचा कोठडीमध्ये झालेला मृत्यू हा पोलीसी अत्याचाराचं प्रतिक असून बीडमध्ये सरपंचाची झालेली हत्या गृह खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशी टीका या नेत्यांनी केली. यासोबतच बीडमध्ये झालेले ३२ खून हा चिंता करायला लावणारा विषय असून, या सगळ्या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांमार्फत तसंच सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली. महायुती सरकारमधल्या घटक पक्षांनी निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासने शेतकरी आणि महिलांना दिलेली आश्वासनं तातडीनं पूर्ण करावीत, विदर्भात होणारं हे अत्यंत कमी कालावधीचं अधिवेशन असून यामुळे विदर्भाला न्याय मिळणार नाही. म्हणून अधिवेशनाचा कालावधी  वाढवावा, परंपरा लक्षात घेता आघाडीच्या नेत्याला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं, अशा मागण्या या नेत्यांनी केल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा