केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना आज एक लाख ७३ हजार ३० कोटी रुपयांचं कर हस्तांतरण जारी करण्यात आलं. यात महाराष्ट्र राज्याचा १० हजार ९३० कोटी ३१ लाख रूपयांचा वाटा आहे. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये सरकाने ८९ हजार ८६ कोटी रुपयांच्या कराचा वाटा राज्यांना दिला आहे.
भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनानं कर हस्तांतरण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे याबद्दल आभार मानले आहेत. राज्याच्या विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांना यामुळं पाठबळ मिळणार असल्याचं फडणवीस यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.