डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

येत्या दोन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

गेल्या चोवीस तासात, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय तर किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं ६ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. 

 

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. 

 

परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून आज सर्वाधिक नीचांकी ४ पूर्णांक ६ शतांश अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा