डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. ५६ हजारांहून अधिक शस्र जमा केली असून ६११ शस्र परवाने रद्द झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ६६० कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता जप्त झाली आहे. त्यात १५३ कोटी रुपयांहून अधिक रोख, २८२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मौल्यवान धातू यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. सर्वाधिक २२९ कोटी रुपयाच्या मालमत्तेची जप्ती मुंबई उपनगर जिल्ह्यात झाली आहे. 

 

नाशिक शहरातल्या एका हॉटेलमध्ये निवडणूक पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात रोकड पकडली. ही रक्कम कोट्यवधी रूपयांच्या घरात असून ती दोन जणांनी आणली असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा