वाशिम जिल्ह्यात भाजपानं युतीचा धर्म पाळला नाही तर, शिवसेना सुद्धा जिल्ह्यात युतीचा धर्म पाळण्यास बांधील राहणार नाही असा इशारा वाशीमचे युवा सेना जिल्हाध्यक्ष रवी भांदुर्गे यांनी दिला आहे. ते वार्ताहरांशी बोलत होते. रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांनी अर्ज भरताना वाशीम मधले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. याचाच अर्थ भाजपा युतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप भांदुर्गे यांनी केला. देशमुख यांनी अर्ज मागे घेतला नाही, किंवा भाजपानं त्यांना पक्षातनं निलंबित केलं नाही तर आपणही जिल्ह्यात युतीचा धर्म पाळणार नाही असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | November 2, 2024 6:58 PM | Maharashtra Vidhansabha Election 2024
वाशिम जिल्ह्यात भाजपानं युतीचा धर्म पाळला नाही तर, शिवसेना युतीचा धर्म पाळण्यास बांधील राहणार नाही – रवी भांदुर्गे
