डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात अनेक ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

 

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सिंधुदुर्ग तसंच पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा,सांगली, सोलापूर जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

 

मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव इथंही पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांना ही यलो अलर्ट जारी केला आहे.

 

विदर्भातही भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा इथंही पुढील पाऊस पडण्याचा अंदाज  हवामान विभागानं वर्तवला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा