महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या १० नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. इयत्ता पहली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व माध्यमातल्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षक पदावरच्या नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. परीक्षेची सूचना आणि इतर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Site Admin | September 14, 2024 3:29 PM | Maharashtra Teacher Eligibility Examination