सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीतल्या एकूण १ हजार ५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत चालक, आणि वाहक या पदांवर सामावून घेतलं जाणार आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी ही माहिती दिली.
या भर्तीमध्ये निवड झालेल्यांपैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भर्तीमधल्या प्रतीक्षा यादीवरच्या सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तसंच, प्रतीक्षा यादीवरच्या उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना आवश्यकतेप्रमाणे सेवेत सामावून घेण्याचा निर्णय झाला आहे, असं एसटी महामंडळाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.