एसटी महामंडळाच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ हे दवाखाने सुरू होणार आहेत. याठिकाणी सर्व नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यासह कमी दरात विविध चाचण्या आणि औषधं मिळणार आहेत. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
प्रत्येक स्थानकावर महिला बचत गटांना नाममात्र दरात भाडे तत्त्वावर स्टॉल दिले जाणार आहेत. नवीन अडीच हजार बसची खरेदी, १०० डिझेल बसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रुपांतर होणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरच्या ईलेक्ट्रिक शिवनेरीमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी हवाई सुंदरींच्या धर्तीवर शिवनेरी सुंदरी नेमण्याचा निर्णयही महामंडळानं घेतला आहे.