महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पारसी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार आणि इतर यावेळी उपस्थित होते.
पारसी समाजाची घसरती लोकसंख्या हे या समुदायासमोरचं सर्वात मोठं आव्हान असून त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार ‘जियो पारसी’ योजना राबवत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. पारसी समुदायाची लोकसंख्या ५० हजाराच्या खाली येऊ नये, यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.