महाराष्ट्र मुद्रांक कायदा १९५८ मधे सुधारणा करणारं विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत मांडलं. प्रतिज्ञापत्रं, करार, तसंच संबधित कागदपत्रांवर सध्या लागणारं १०० रुपयांचं मुद्रांक शुल्क १०० रुपयांवरून ५०० रुपये करण्याची तरतूद यात प्रस्तावित आहे. भागभांडवलावरच्या मुद्रांक शुल्कासाठी भांडवलाची मर्यादा ५० लाखावरून १ कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. याबाबतचा अध्यादेश सरकारनं १४ ऑक्टोबरला काढला होता.
Site Admin | December 17, 2024 8:37 PM | Maharashtra Stamp Act 1958