काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी विभागानं ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
जम्मू आणि काश्मीर सरकारनं बडगाम जिल्ह्यातल्या इच्चगाम तालुक्यात अडीच एकर जमीन महाराष्ट्र सदनाच्या वास्तूसाठी प्रदान केली आहे. आता सदनाच्या वास्तूचं स्वरूप, त्यातल्या सोयी-सुविधा आणि आराखड्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल आणि लवकरच काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभं राहील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.