महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला आजपासून बीडमधे सुरुवात होत आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथं संध्याकाळी ७ वाजता ‘अचानक’ या नाटकानं स्पर्धेची सुरुवात होईल. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ६ नाट्यसंस्था सहभाग घेणार आहेत. कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडून यावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे.
Site Admin | December 7, 2024 5:20 PM | महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा