डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

राज्यातल्या अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी वीजांसह सुमारे तासभराहून अधिक काळ जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला असला, तरी आंबा-काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसानकारक ठरणार आहे. 

 

धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नेर गावासह परिसरात गारपीटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

 

नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावात गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वारे आणि पावसामुळं काढणीस आलेल्या आणि शेतात काढून ठेवलेल्या कांद्यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

 

भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. तुमसर तालुक्यातल्या पाथरी इथं वीज पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे.

 

नागपूर जिल्ह्यात आज सकाळपासून  वादळी वाऱ्यासह  अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.   

 

पुढचे दोन-तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा