महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये २६ ते २८ डिसेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतल्या दक्षिणेकडच्या तुरळक भागांत, २७ डिसेंबर रोजी खानदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी, तर २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाड्यातले उत्तरेकडचे जिल्हे आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातल्या शेतकऱ्यांनी कृषिविषयक सल्ला आणि हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून त्यानुसार नियोजन करावं, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
Site Admin | December 24, 2024 2:53 PM | Maharashtra Rain