महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्यानं कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत आणि सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आणि त्यांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त, संबधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन पवार यांनी केलं आहे. भारतीय हवामान खात्यानं पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘लाल बावटा’ जारी केला आहे.
Site Admin | August 4, 2024 9:56 AM | Heavy rain | pune heavy rain | Weather report | Weather Update