डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अंमलीपदार्थांच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणारे पोलीस सेवेतून बडतर्फ

अंमलीपदार्थांच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं यापुढे केवळ निलंबन न करता पोलीस सेवेतून बडतर्फ केलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत झालेल्या पोलीस संमेलनात बोलत होते. या संमेलनात देशात नव्यानं  तयार झालेल्या तिन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीचं आणि सायबर प्लॅटफॉर्मचं   सादरीकरण झालं.

 

तसंच, महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी न्यायालयासमोर आरोपपत्र जलद गतीनं वेळेत कसं ठेवता येईल, यावर देखील चर्चा झाली. नवीन कायद्यानुसार एखाद्या गुन्ह्यात लोकांची जप्त केलेली संपत्ती परत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. सहा महिन्यांत लोकांचा मुद्देमाल परत दिला गेला पाहिजे ज्यामुळे  पोलिस ठाण्यांची जबाबदारी कमी होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा